Latest Marathi Updates : एका क्लिकवर वाचा, देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी (2024)

Table of Contents
Ajit Pawar: मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी अजित पवार 'वर्षा'वर Maharashtra Rain: पुढील ३ तासांत 'या' जिलह्यांत मुसळधार पावसाची शक्यता PM Modi Tweet:जागतिक हितासाठी भारत-अमेरिका... PM Kisan: पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता 'या' तारखेला येणार Fire: भाईंदरमध्ये दुकानाला भीषण आग रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे अपघातातील जखमींची भेट दिवसा लावावे लागले वाहनांचे दिवे! नागपूरात तुफान पाऊस नागपूरमध्ये जोरदार पाऊस; अनेक भागांमध्ये साचलं पाणी Railway: लवकरच धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन! Amit Shah : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आमित शहांची भेट? ग्रीड तुटल्याने दिल्ली विमानतळावरील वीज पुरवठा खंडीत कोल्हापूर पोलीस ॲक्शन मोडवर!भडकाऊ रिल्स बनवणाऱ्या टोळ्यांवर असणारकरडी नजर पंतप्रधानमोदी 18 जूनजारी करतील PM किसान योजनेचा 17वा हप्ता एअर इंडियाच्या प्रवाशाला जेवणात सापडलं ब्लेड! दिल्लीत महाराष्ट्र सदानात पाणी टंचाई, बिसलेरीच्या पाण्यानं आंघोळ महाराष्ट्रातभाजपकडून दोन प्रभारींची नियुक्ती; वैष्णव, यादव यांच्यावर जबाबदारी आषाढी वारीसाठी 'शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेने'नं घेतला पुढाकार दार्जिलिंग ट्रेन अपघातात8 जणांचा मृत्यू, 50 जण जखमी;बचावकार्य पूर्ण मुंबईला 20 ते 22 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा विधानसभेत मविआने राष्ट्रवादीला जास्त जागा द्याव्यात - रोहित पवार Kanchenjunga Express Accident :दार्जिलिंग येथे झालेल्या रेल्वे अपघातावरराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचेट्विट Kanchenjunga Express Accident : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तातडीने पश्चिम बंगालला रवाना Kanchenjunga Express Accident: कांचनजंगा एक्सप्रेसच्या अपघातानंतर रेल्वेमंत्र्यांनी दिली माहिती Railway Accident:कांचनजंगा एक्सप्रेसच्याअपघातानंतररंगपाणी स्थानकावर उभारला नियंत्रण डेस्क Railway Accident:पश्चिम बंगालमध्ये कंचनजंगा एक्सप्रेसचा अपघात Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावली महत्त्वपूर्ण बैठक Mumbai News: शिंदे - ठाकरे गटाचे दुर्गाडी देवीच्या पायथ्याशी घंटानाद आंदोलन Guwahati Rain : मुसळधार पावसामुळे गुवाहाटीतीलजनजीवन विस्कळीत Nikhil Gupta : खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचणाऱ्या भारतीय आरोपीचं प्रत्यार्पण; निखिल गुप्ताला पाठवलं अमेरिकेला Kolkata Police : पश्चिम बंगालचे राज्यपाल नव्या अडचणीत, पुतण्यावर बलात्काराचा आरोप Ghanta Naad Andolan : कल्याणमध्ये लालचौकी परिसरात ठाकरे गटाकडून घंटानाद आंदोलन Madan Bhosale : भाजप नेतेमदन भोसले यांच्यावर गुन्‍हा दाखल Mukhtar Abbas Naqvi : भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वींनी ईदनिमित्त दर्ग्यात केली नमाज अदा Raju Shetti : 'स्वाभिमानी'ची २२ व २३ जूनला बारामतीत राज्य कार्यकारिणी बैठक Heat Wave : मक्का-मदीनात उष्णतेची लाट; 19 हज यात्रेकरूंचा उष्माघातामुळे मृत्यू Almatti Dam : 'आलमट्टीबरोबरच हिप्परगेही महापुरासाठी कारणीभूत' Weather Update : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीला 'ब्रेक'; राज्यात पावसाचा जोर ओसरला Related Stories

देश

महाराष्ट्रात आल्यानंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) प्रगतीला ‘ब्रेक’ लागल्याची स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे.

Latest Marathi Updates : एका क्लिकवर वाचा, देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी (1)

Latest Marathi News Live UpdateEsakal

Ajit Pawar: मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी अजित पवार 'वर्षा'वर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवस्थान वर्षा येथे दाखल झाले आहे. या भेटीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराव चर्चा होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Rain: पुढील ३ तासांत 'या' जिलह्यांत मुसळधार पावसाची शक्यता

आज पुढील ३ तासांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामध्ये बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर छ. संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

PM Modi Tweet:जागतिक हितासाठी भारत-अमेरिका...

"अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांची भेट घेतली. जागतिक हितासाठी भारत-अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे," असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

PM Narendra Modi tweets, "Met US National Security Advisor Jake Sullivan. India is committed to further strengthen the India-US Comprehensive Global Strategic Partnership for global good." pic.twitter.com/HLudKuwtwe

— ANI (@ANI) June 17, 2024

PM Kisan: पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता 'या' तारखेला येणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जून रोजी वाराणसी येथे #PMKISAN योजनेचा 17 वा हप्ता जारी करणार आहेत.

Fire: भाईंदरमध्ये दुकानाला भीषण आग

भाईंदरमध्ये दुकानाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही आग इतकी भीषण होती की, यामध्ये दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे अपघातातील जखमींची भेट

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सिलीगुडीतील उत्तर बंगाल मेडिकल कॉलेजला भेट दिली आणि कांचनगंगा एक्सप्रेस ट्रेन अपघातातील जखमींची भेट घेतली.

#WATCH | Kanchenjunga Express train accident: Railways Minister Ashwini Vaishnaw visits North Bengal Medical College in Siliguri and meets the injured.

(Source: Railway CPRO) pic.twitter.com/cp1pg6tHZG

— ANI (@ANI) June 17, 2024

दिवसा लावावे लागले वाहनांचे दिवे! नागपूरात तुफान पाऊस

नागपूर शहरातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला असून दिवसा काळोख दाटल्यानं वाहनांचे दिवे लावावे लागल्याचे पाहायला मिळाले. अचानक आलेल्या पावसान विना छत्री निघाल्याने नागरिकांची तारांबळ उडल्याचे पाहायला मिळाले.

VIDEO | Heavy rainfall lashes parts of Nagpur, Maharashtra. pic.twitter.com/acUVewGDhH

— Press Trust of India (@PTI_News) June 17, 2024

नागपूरमध्ये जोरदार पाऊस; अनेक भागांमध्ये साचलं पाणी

नागपूरात विजांचा कडकडाटसह जोरदार पावसाला जोरदार सुरवात झाली असून हवामान विभागकडून यलो अलर्ट देण्यात आला होता. हा मॉन्सूनचा पाऊस नसून लोकल परिस्थिती मुळे तयार झालेले पाऊस आहे. हवामान विभागाचा माहितीनुसार मॉन्सूनला पोषक वातावरण तयार झाले नसल्यानं अजून पूर्व विदर्भात मॉन्सूनचा पाऊस नाही. नागपुरात मागील काही दिवसांपासून 41 अंशाचा घरात तापमान होते, आज झालेला पाऊस हा नक्कीच उकाड्यापासून दिलासा देणारा आहे..

Railway: लवकरच धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन!

बहुप्रतिक्षित असलेल्या वंदे भारत स्लीपर ट्रेन येत्या दोन महिन्यात रेल्वे रुळावर धावणार आहे. ऑगस्ट महिन्यात वंदे भारत ट्रेनची स्लीपर ट्रेनची चाचणी घेण्यात येणार आहे. यशस्वी चाचणीनंतर देशाची पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन दिल्ली ते मुंबई दरम्यान धावण्याची शक्यता आहे. यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडून नियोजन सुद्धा सुरु झाले असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळला दिली.

Amit Shah : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आमित शहांची भेट?

भाजपची उद्या दिल्लीमध्ये कोर कमिटीची होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयावर उद्या चर्चा होण्याची शक्यता आहे.यावेळी देवेंद्र फडणवीस आमित शहांची भेट घेवू शकतात.

ग्रीड तुटल्याने दिल्ली विमानतळावरील वीज पुरवठा खंडीत

ग्रीड तुटल्याने दिल्ली विमानतळावरील वीज पुरवठा खंडीत झाल्याची माहिती समोर आली आहे.

कोल्हापूर पोलीस ॲक्शन मोडवर!भडकाऊ रिल्स बनवणाऱ्या टोळ्यांवर असणारकरडी नजर

कोल्हापूर : भडकाऊ रिल्स बनवणाऱ्या टोळ्यांवर कोल्हापूर पोलिसांची करडी नजर असणार आहे. एकमेकांना धमकवणारे रिल्स टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात विशेष मोहीम राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. रिल्स बनवणाऱ्या गुन्हेगारांवर सायबर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. जिल्ह्यात आजपासून भडकाऊ रिलीज करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई सुरू करण्यात येणार आहे.

पंतप्रधानमोदी 18 जूनजारी करतील PM किसान योजनेचा 17वा हप्ता

पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जून 2024 रोजी वाराणसी येथे PM-KISAN योजनेचा 17 वा हप्ता जारी करतील, ज्यामध्ये 9.26 कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे लाभ मिळतील. पॅरा एक्स्टेंशन वर्कर्स म्हणून काम करण्यासाठी कृषी सखी म्हणून प्रशिक्षित झालेल्या 30,000 हून अधिक बचत गटांनाही पंतप्रधान प्रमाणपत्रांचे वितरण करतील.

एअर इंडियाच्या प्रवाशाला जेवणात सापडलं ब्लेड!

Air India passenger finds metal blade in meal

Rajesh Dogra, Chief Customer Experience Officer, Air India says, "Air India confirms that a foreign object was found in the meal of a guest aboard one of our flights. After investigation, it has been identified as coming from the…

— ANI (@ANI) June 17, 2024

दिल्लीत महाराष्ट्र सदानात पाणी टंचाई, बिसलेरीच्या पाण्यानं आंघोळ

दिल्लीत सध्या प्रचंड पाणी टंचाई असून इथं महाराष्ट्र सदनातही त्याचा फटका बसला आहे. या ठिकाणी अधिकारी वर्गाला बिसलेरीच्या पाण्यानं आंघोळ करावी लागत आहे.

महाराष्ट्रातभाजपकडून दोन प्रभारींची नियुक्ती; वैष्णव, यादव यांच्यावर जबाबदारी

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात भाजपकडून दोन प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये अश्विनी वैष्णव आणि भुपेंद्र यादव यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळं विधानसभा निवडणुकीच्या हालचाली आता वेगानं सुरु झाल्या आहेत.

आषाढी वारीसाठी 'शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेने'नं घेतला पुढाकार

आषाढी वारीसाठी 'शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेने'नं घेतला पुढाकार घेतला असून १० पालखी प्रमुखांना मुख्यमंत्र्यांसोबत पंढरपूरच्या पुजेचा मान दिला आहे. साम टीव्हीनं आपल्या सुत्रांच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे.

वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना मुलभूत सुविधांचं वाटप शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेद्वारे दिल्या जाणार आहेत. या वारीत १०० ते १५० अध्यात्मिक सेनेचे सेवेकरी वारकऱ्यांची सेवा करणार आहेत. यावेळी निवारा शेड उभारणार, औषध उपचार, छत्री इतर सर्व मूलभूत गरजांचीही व्यवस्था केली जाणार आहे.

त्याचबरोबर वारकऱ्यांना कापडी बुट व पायाची मसाज करण्यासाठी विशेष उपकरणं हाताळणारी १० व्यक्तींची टीम तैनात असणार आहे.

दार्जिलिंग ट्रेन अपघातात8 जणांचा मृत्यू, 50 जण जखमी;बचावकार्य पूर्ण

दार्जिलिंग ट्रेन अपघातावर रेल्वे बोर्डच्या अध्यक्षा जया वर्मा सिन्हा यांची पत्रकार परिषद घेतली.

बचावकार्य पूर्ण झाल आहे. पाच प्रवासी आणि तीन रेल्वे कर्मचारी यांचा मृत्यू झाला.... एकूण 8 लोकांचा आतापर्यंत अपघातात मृत्यू झाला आहे.

पन्नास लोक जखमी झालेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिग्नल कडे दुर्लक्ष झालं अशी प्राथमिकमाहितीसमोर आली.

मुंबईला 20 ते 22 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

मुंबईला 20 ते 22 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये 5.38 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.

मुंबईला 20 ते 22 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे मुंबईत पाणी संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे.

अप्पर वैतरणा आणि भातसा जलाशयात शून्य टक्के पाणीसाठा

कोणत्या जलाशयात किती पाणीसाठा उपलब्ध-

अप्पर वैतरणा -0 टक्के

मोडक सागर - 15.73 टक्के

तानसा - 22.05 टक्के

मध्य वैतरणा - 9.64 टक्के

भातसा - 0 टक्के

विहार - 17.92 टक्के

तुळसी- 24.46 टक्के

आज जलाशयात म्हणून एकूण 77,851 दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईला दररोज 3800 दशलक्ष लीटर एवढा पाणीपुरवठा होतो. यामध्ये दहा ते पंधरा टक्के पाणी कपात सध्याकरण्यातआलीआहे

विधानसभेत मविआने राष्ट्रवादीला जास्त जागा द्याव्यात - रोहित पवार

लोकसभेत राष्ट्रवादीने मोठ मन दाखवून सेनेला जास्त जागा दिल्या. आता विधानसभेत मविआने राष्ट्रवादीला जास्त जागा द्याव्यात. आमचे ८५ आमदार निवडून आणण्याची इच्छा आहे… त्यासाठी काम करु द्यावे. जागावाटपाबाबत वरिष्ठनिर्णयघेतील, असे रोहित पवार म्हणाले.

Kanchenjunga Express Accident :दार्जिलिंग येथे झालेल्या रेल्वे अपघातावरराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचेट्विट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ट्विट केले की, "पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे झालेल्या रेल्वे अपघातात झालेल्या जीवितहानीचे वृत्त अत्यंत दुःखदायक आहे. मी जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी आणि मदत यशस्वी होण्यासाठी प्रार्थना करते

Kanchenjunga Express Accident : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तातडीने पश्चिम बंगालला रवाना

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तातडीने पश्चिम बंगालला रवाना झाले आहेत. दार्जिलिंग मधील घटना स्थळाला भेट देणार आहेत. अपघात स्थळाची पाहणी करणार आहेत. जखमींची रुग्णालयात जाऊन घेणार भेट घेणार आहेत.

Kanchenjunga Express Accident: कांचनजंगा एक्सप्रेसच्या अपघातानंतर रेल्वेमंत्र्यांनी दिली माहिती

NFR झोनमध्ये दुर्दैवी अपघात झाला आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वे, NDRF आणि SDRF जवळच्या समन्वयाने काम करत आहेत. जखमींना रुग्णालयात हलवण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Unfortunate accident in NFR zone. Rescue operations going on at war footing. Railways, NDRF and SDRF are working in close coordination. Injured are being shifted to the hospital. Senior officials have reached site.

— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) June 17, 2024

Railway Accident:कांचनजंगा एक्सप्रेसच्याअपघातानंतररंगपाणी स्थानकावर उभारला नियंत्रण डेस्क

पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील रुईधासा येथे कांचनजंगा एक्स्प्रेस ट्रेनने मालगाडीने धडक दिल्यानंतर सियालदह पूर्व रेल्वेने रंगपाणी स्थानकावर नियंत्रण डेस्क उभारला. वरिष्ठ तिकीट कलेक्टर, राजू प्रसाद यादव म्हणाले, "आम्हाला अद्याप कोणताही फोन आलेला नाही. दोन महिला चौकशीसाठी आल्या होत्या..."

#WATCH | Sealdah Eastern Railway sets up a control desk at Rangapani station after the Kanchenjunga Express train rammed by a goods train at Ruidhasa in Darjeeling district of West Bengal

Senior Ticket Collector, Raju Prashad Yadav says, "We haven't received any calls yet. Two… pic.twitter.com/TgBkiJsp9P

— ANI (@ANI) June 17, 2024

Railway Accident:पश्चिम बंगालमध्ये कंचनजंगा एक्सप्रेसचा अपघात

पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात ट्रेनचा अपघात झाल्याची घटना घडली. मालगाडीने धडक दिल्यानंतर कंचनजंगा एक्सप्रेस ट्रेन रुळावरून घसरून अपघात झाला. मालगाडीने धडक दिल्याने आग लागल्याची माहिती मिळत आहे. बचाव कार्यासाठी आपत्ती पथक घटनास्थळी पोहोचले आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावली महत्त्वपूर्ण बैठक

आज संध्याकाळी 4 वाजता होणार बैठक मणिपूरचे मुख्यमंत्री आणि मणिपूर पोलीस दलातील उच्च अधिकारी बैठकीत सहभागी होणार आहेत. कालच राज्यपाल अनुसया उईके यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर बैठकीला मोठं महत्त्व

Mumbai News: शिंदे - ठाकरे गटाचे दुर्गाडी देवीच्या पायथ्याशी घंटानाद आंदोलन

राज्यभरात मुस्लिम बांधवांकडून ईद उत्सव साजरा केला जात आहे. कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळ मात्र काहीसे तणावाचे वातावरण पहायला मिळाले. दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही शिवसेनेकडून दुर्गाडी किल्ल्यासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. शिवसेना शिंदे व ठाकरे गटात विभागली गेली असली तरी गेल्या 38 वर्षांपासून सुरू असलेल्या या आंदोलनासाठी दोन्ही गट एकत्र आल्याचे दिसून आले. आंदोलन दरम्यान काही शिवसैनिकांनी बॅरिकेट्स ओलांडून किल्ल्यात प्रवेश करण्याचाही प्रयत्न केल्याचं दिसून आलं.

Guwahati Rain : मुसळधार पावसामुळे गुवाहाटीतीलजनजीवन विस्कळीत

मुसळधार पावसामुळे गुवाहाटीतील अनिल नगर आणि चांदमारी भागात रस्त्यावर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने (IMD) गुवाहाटीमध्ये या संपूर्ण आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

#WATCH | Normal life is affected as streets are waterlogged in Anil Nagar and Chandmari areas of Guwahati due to heavy rainfall

India Meteorological Department (IMD) predicts rain in Guwahati for this whole week. pic.twitter.com/X5lZ4tDnli

— ANI (@ANI) June 17, 2024

Nikhil Gupta : खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचणाऱ्या भारतीय आरोपीचं प्रत्यार्पण; निखिल गुप्ताला पाठवलं अमेरिकेला

अमेरिकेत खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेल्या निखिल गुप्ता याला चेक रिपब्लिकने प्रत्यार्पण केले आहे. फेडरल ब्युरो ऑफ प्रिझन्सच्या वेबसाइटनुसार, गुप्ता यांना अमेरिकेला पाठवण्यात आले आहे. अमेरिकन प्रशासनाच्या विनंतीवरून निखिल गुप्ताला गेल्या वर्षी जूनमध्ये अटक करण्यात आली होती. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग बन्नूच्या हत्येचा कट रचण्यात त्याचा हात असल्याचा आरोप आहे.

Kolkata Police : पश्चिम बंगालचे राज्यपाल नव्या अडचणीत, पुतण्यावर बलात्काराचा आरोप

कोलकाता पोलिसांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांच्या पुतण्याविरुद्ध गुन्हेगारी कट आणि बलात्काराच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवला आहे. एका ओडिसा डान्सरनं राज्यपाल आणि त्यांच्या पुतण्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. जानेवारी 2023 मध्ये दिल्लीतील एका हॉटेलमध्ये तिचं शोषण झाल्याचं तिनं म्हटलंय.

Ghanta Naad Andolan : कल्याणमध्ये लालचौकी परिसरात ठाकरे गटाकडून घंटानाद आंदोलन

कल्याणमधील लालचौकी परिसरात ठाकरे गटाकडून घंटा नाद आंदोलन केले जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी शिंदे गटातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. तर, दुसरीकडं ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी घंटा वाजवत आंदोलनाला सुरवात केलीये. दरवर्षी बकरी ईदच्या दिवशी समस्त हिंदूंची अस्मिता जपण्यासाठी.. हिंदू भाविकांवरील अन्यायाविरोधात हिंदू बांधवांना दुर्गाडी देवीच्या मंदिरात प्रवेश बंदी घालण्यात येते, त्यामुळे हे आंदोलन करण्यात येते.

Madan Bhosale : भाजप नेतेमदन भोसले यांच्यावर गुन्‍हा दाखल

वाई : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाने कर्ज मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रे व माहिती देऊन बँक ऑफ इंडियाची ६१ कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार बँकेने कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष चंद्रकांत बजरंग इंगवले, कार्यकारी संचालक अशोक भार्गव जाधव व इतरांविरोधात सीबीआयकडे केली होती. त्‍यानुसार याबाबतचा गुन्‍हा सीबीआयकडे पुणे येथे नोंदविण्‍यात आला आहे. इथे क्लिक करा

Mukhtar Abbas Naqvi : भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वींनी ईदनिमित्त दर्ग्यात केली नमाज अदा

दिल्ली : भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी ईदनिमित्त दर्गाह पंजा शरीफ येथे नमाज अदा केली.

#WATCH | Delhi: BJP Leader Mukhtar Abbas Naqvi offers Namaz at Dargah Panja Sharif on the occasion of Eid Al Adha pic.twitter.com/bVcNW9Ec6K

— ANI (@ANI) June 17, 2024

Raju Shetti : 'स्वाभिमानी'ची २२ व २३ जूनला बारामतीत राज्य कार्यकारिणी बैठक

जयसिंगपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक २२ व २३ जूनला बारामतीत होणार आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे चिंतन आणि शेतकरी प्रश्नांवर आंदोलनाची दिशा स्पष्ट होणार आहे.

Heat Wave : मक्का-मदीनात उष्णतेची लाट; 19 हज यात्रेकरूंचा उष्माघातामुळे मृत्यू

उष्णतेचा कहर केवळ भारताच्या उत्तर-पश्चिम भागातच नाही, तर जगातील इतर देशांमध्येही पाहायला मिळत आहे. सौदी अरेबियात हज यात्रेसाठी आलेल्या 19 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. यंदा तापमानात मोठी वाढ झाली असून उष्णतेने कहर केला असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Almatti Dam : 'आलमट्टीबरोबरच हिप्परगेही महापुरासाठी कारणीभूत'

नृसिंहवाडी : महापूर येऊ नये म्हणून अद्याप महाराष्ट्र पूरनियंत्रण समिती नाही ही बाब खेदजनक आहे. अलमट्टी धरणाबरोबर हिप्परगे बॅरेजही (बंधारा) महापुरासाठी कारणीभूत आहे, असा सूर येथे पूर परिषदेत व्यक्त झाला. यावेळी विविध दहा ठराव सर्वांनुमते मंजूर करण्यात आले. आंदोलन अंकुश, कृष्णा महापूर नियंत्रण समिती व स्पंदन प्रतिष्ठानतर्फे तिसरी पूर परिषद येथील विठ्ठल मंदिर परिसरात झाली.

Weather Update : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीला 'ब्रेक'; राज्यात पावसाचा जोर ओसरला

Latest Marathi Live Updates : महाराष्ट्रात आल्यानंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) प्रगतीला ‘ब्रेक’ लागल्याची स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. राज्यात पावसाचा जोर ओसरला असून, गेल्या सहा दिवसांपासून त्याच्या वाटचालीत फारशी प्रगती झाली नाही, अशी माहिती हवामान खात्याने दिली. तर, राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा ‘एमएचटी-सीईटी-२०२४’चा निकाल आज जाहीर झाला आहे. ‘ईव्हीएम’ हॅक करणे शक्य असल्याने त्याचा वापर बंद करण्याची गरज उद्योगपती एलॉन मस्क यांनी व्यक्त केलीये. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar

Bjp

Pune News

Mumbai News

Narendra Modi

Rahul Gandhi

Shiv Sena

Ajit Pawar

Devendra Fadnavis

Uddhav Thackeray

Congress

NCP

Eknath Shinde

CET Exam

EVM

Monsoon Rain

Maharashtra Weather Alert

Related Stories

No stories found.

Latest Marathi Updates : एका क्लिकवर वाचा, देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी (2024)
Top Articles
Latest Posts
Article information

Author: Prof. Nancy Dach

Last Updated:

Views: 6644

Rating: 4.7 / 5 (77 voted)

Reviews: 92% of readers found this page helpful

Author information

Name: Prof. Nancy Dach

Birthday: 1993-08-23

Address: 569 Waelchi Ports, South Blainebury, LA 11589

Phone: +9958996486049

Job: Sales Manager

Hobby: Web surfing, Scuba diving, Mountaineering, Writing, Sailing, Dance, Blacksmithing

Introduction: My name is Prof. Nancy Dach, I am a lively, joyous, courageous, lovely, tender, charming, open person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.