Latest Marathi News: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर (2024)

Table of Contents
...तर अधिकाऱ्यांना सोडणार नाही, नीट प्रकरणी शिक्षणमंत्री आक्रमक New Parliament: संसद भवन संकुलात नव्याने बांधलेल्या प्रेरणास्थळाचे उद्घाटन Sanjay Raut: "मोदी नीतीश-नायुडू यांचा पक्ष फोडणार" Lok Sabha Session: लोकसभा अधिवेशनापूर्वी भाजपची खलबतं आण्णासाहेब पाटील महामंडळातील 61 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं ईव्हीएमअनलॉक करण्यासाठी ओटीपीची गरज नाही -वंदना सूर्यवंशी भाजप नेते राजा सिंह यांना शमशाबाद विमातळावर अटक हरियाणातील झज्जरमधील एका खासगी रुग्णालयात आग भोपाळमध्ये शिवराज सिंह चौहान यांचं जंगी स्वागत मुंबईवर पाणीसंकट, भातसा धरणात २२ टक्के साठा शिल्लक विनायक राऊतांच्या पराभवामुळे वैभव नाईकांची जाहीर माफी कोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा जयदत्त क्षीरसागरांच्या मेळाव्याला संदीप क्षीरसागरांच्या वडिलांची उपस्थिती बीडमध्ये जयदत्त क्षीरसागरांच्या मेळाव्याला सुरुवात पंकजा मुंडे आज जिल्हा दौऱ्यावर; पराभव जिव्हारी लागून आत्महत्या केलेल्या कुटुंबियांची घेणार भेट औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर श्रीरामपूर तालुक्यातील वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील अतिक्रमणे हटवली शक्तिपीठ महामार्गाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध; खासदार अशोक चव्हाणांनी घेतली भेट Fire News:मुंडका इंडस्ट्रियल एरियातील एका कारखान्याला लागली भीषणआग UPSC Exam:गल मॅपमुळे UPSC परिक्षेपासून वंचित! 3 मिनीटं उशिराने पोहचल्यानं प्रवेश नाकारला Maratha Reservation:ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची तब्येत खालावली Turbhe: तुर्भे एमआयडीसी परिसरात पाण्यात बुडून 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू Delhi Metro:UPSC च्या विद्यार्थांसाठीदिल्ली मेट्रो ट्रेनचा निर्णय;फेज-3 चीट्रेन सेवा आज लवकर सुरू होणार Eknath Shinde: निरंजन डावखरे यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे ठाण्यात घेणार मेळावा Navi Mumbai: नवी मुंबईत आजपासून तीन दिवस पाणी कपात सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर अपघात, 4 जण गंभीर जखमी Ashadi Vari: पालखी सोहळ्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज MHT CET: 'एमएचटी- सीईटी’चा निकाल आज होणार जाहीर Related Stories

देश

Latest Marathi News: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर (1)

live blogsakal

...तर अधिकाऱ्यांना सोडणार नाही, नीट प्रकरणी शिक्षणमंत्री आक्रमक

केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले की, यंदाची NEET Exam आयोजित करण्यात अनियमितता आढळल्यास एनटीएच्या कोणत्याही अधिकाऱ्याला सोडले जाणार नाही.

New Parliament: संसद भवन संकुलात नव्याने बांधलेल्या प्रेरणास्थळाचे उद्घाटन

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष, जगदीप धनखर यांनी संसद भवन संकुलात नव्याने बांधलेल्या प्रेरणास्थळाचे उद्घाटन केले.

Sanjay Raut: "मोदी नीतीश-नायुडू यांचा पक्ष फोडणार"

पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीएतील घटक असलेल्या नीतीश कुमार आणि चंद्राबाबू नायुडू यांचा पक्ष फोडणार असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Lok Sabha Session: लोकसभा अधिवेशनापूर्वी भाजपची खलबतं

18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. त्यापूर्वी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली.

#WATCH दिल्ली: केंद्रीय मंत्री और भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा रक्षा मंत्री राजनाथ सिंह के आवास से रवाना हुए।

18वीं लोकसभा के पहले संसदीय सत्र को लेकर रक्षा मंत्री राजनाथ सिंह के आवास पर NDA की बैठक हुई। pic.twitter.com/iLwR4ocRxD

— ANI_HindiNews (@AHindinews) June 16, 2024

आण्णासाहेब पाटील महामंडळातील 61 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं

आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळातील 61 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून काढण्यात आले आहे. यामुळे महामंडळाचे काम मोठ्या प्रमाणात रखडणार आहे.

ईव्हीएमअनलॉक करण्यासाठी ओटीपीची गरज नाही -वंदना सूर्यवंशी

ईव्हीएम ही एक स्वतंत्र प्रणाली आहे, ती अनलॉक करण्यासाठी ओटीपीची गरज नाही: वंदना सूर्यवंशी, मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा सीट रिटर्निंग ऑफिसर

EVM a standalone system, no need for OTP to unlock it: Vandana Suryavanshi, Mumbai North West Lok Sabha seat returning officer: PTI MR

— Press Trust of India (@PTI_News) June 16, 2024

भाजप नेते राजा सिंह यांना शमशाबाद विमातळावर अटक

तेलंगणा: भाजप नेते राजा सिंह यांना जनावरांची वाहतूक आणि विक्रीच्या मुद्द्यांवरून जातीय तणावाचे वातावरण असलेल्या मेडकला भेट देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल शमशाबाद विमानतळावर अटक करण्यात आली आहे. आम्ही शमशाबाद विमानतळावर प्रतिबंधात्मक अटक केली आहे. त्यांना मेडकला जायचे होते पण आम्ही त्यांना त्यांच्या घरी सोडले अशी माहिती शमशाबाद विमानतळ पोलीसांनी दिली आहे.

#WATCH | Telangana: BJP leader Raja Singh arrested at Shamshabad airport for trying to visit Medak, where communal tension prevails over cattle transportation and sale issues.

We have done preventive arrest at Shamshabad Airport. He wanted to go to Medak but we left him at his… pic.twitter.com/Ln7BbVZV7V

— ANI (@ANI) June 16, 2024

हरियाणातील झज्जरमधील एका खासगी रुग्णालयात आग

हरियाणातील झज्जरमधील एका खासगी रुग्णालयात आग लागली. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून अधीक माहिती मिळू शकलेली नाही.

#WATCH | Fire broke out at a private hospital in Haryana's Jhajjar. Fire tenders present at the spot. More details awaited. pic.twitter.com/cmCH3ckCmr

— ANI (@ANI) June 16, 2024

भोपाळमध्ये शिवराज सिंह चौहान यांचं जंगी स्वागत

केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवराजसिंह चौहान हे पहिल्यांदाच भोपाळमध्ये दाखल झाले. शहरात त्यांनी रोड शो केला. नागरिकांनी त्यांचं उत्स्फुर्तपणे स्वागत केलं.

#WATCH | Madhya Pradesh: Union Minister Shivraj Singh Chouhan holds a roadshow in Bhopal.

He has reached Bhopal for the first time after taking oath as Union Minister. pic.twitter.com/qG33MOro8K

— ANI (@ANI) June 16, 2024

मुंबईवर पाणीसंकट, भातसा धरणात २२ टक्के साठा शिल्लक

भातसा धरणात २२ टक्के पाणीसाठा शिल्लक असून मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट उद्भवलं आहे.

विनायक राऊतांच्या पराभवामुळे वैभव नाईकांची जाहीर माफी

नारायण राणेंना लीड मिळाली आणि विनायक राऊतांचा पराभव झाला, त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी जाहीर माफी मागितली आहे.

कोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा

मोसमी पाऊस सुरु झालेला असून आज कोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

जयदत्त क्षीरसागरांच्या मेळाव्याला संदीप क्षीरसागरांच्या वडिलांची उपस्थिती

आमदार संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांनी बीडमध्ये जयदत्त क्षीरसागरांच्या कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी लावली आहे. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करतात का? हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

बीडमध्ये जयदत्त क्षीरसागरांच्या मेळाव्याला सुरुवात

माजी मंत्री तथा मागच्या दोन वर्षांपासून राजकीय विजनवासात गेलेले ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर यांनी बीडमध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्याला सुरुवात झाली आहे.

पंकजा मुंडे आज जिल्हा दौऱ्यावर; पराभव जिव्हारी लागून आत्महत्या केलेल्या कुटुंबियांची घेणार भेट

बीड लोकसभेतील पराभवानंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने 3 मुंडे समर्थकांनी आत्महत्या केल्या होत्या. याच आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची पंकजा मुंडे आज भेट घेणार आहेत. आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी येथील पोपट वायबसे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले जाणार आहे. त्यानंतर दिघोळआंबा येथील पांडुरंग सोनवणे यांच्या कुटुंबीयांची पंकजा मुंडे भेट घेतील.

औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर श्रीरामपूर तालुक्यातील वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील अतिक्रमणे हटवली

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. वर्षानुवर्षे याठिकाणी अनेक कुटुंब वास्तव्यास होती तर अनेकांचे व्यवसाय सुरू होते. अतिक्रमणाचा विषय गेल्या 33 वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित होता. अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. मात्र ऐन पावसाळ्याच्या तोंडावर संसार उघड्यावर आल्याने अनेकांना गहिवरून आले होते.

शक्तिपीठ महामार्गाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध; खासदार अशोक चव्हाणांनी घेतली भेट

शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आम्हाला मावेजा नको, शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी खासदार अशोकराव चव्हाण यांच्याकडे भेट घेऊन केली आहे. आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहोत शेतीवरच आमचं जीवन आहे. मावेजा घेऊन आम्ही जगायचं कसं, आम्हाला हा मार्ग कोणत्याही भावात नकोय, जर शेतकऱ्याचं विरोध झुंजारून हा महामार्ग करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

Fire News:मुंडका इंडस्ट्रियल एरियातील एका कारखान्याला लागली भीषणआग

मुंडका इंडस्ट्रियल एरियातील एका कारखान्याला आग लागली. सुमारे 35 अग्निशमन दल घटनास्थळी उपस्थित आहेत.

A fire broke out in a factory in Mundka Industrial Area. Around 35 fire tenders are present at the spot: Delhi Fire Service

More details awaited.

— ANI (@ANI) June 16, 2024

UPSC Exam:गल मॅपमुळे UPSC परिक्षेपासून वंचित! 3 मिनीटं उशिराने पोहचल्यानं प्रवेश नाकारला

छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. गुगल मॅप लोकेशनमुळे अनेक विद्यार्थी यूपीएससीच्या परीक्षेपासून वंचित राहिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वर्षानुवर्ष अभ्यास करून आलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. या परिक्षेसाठी बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थिनींना अश्रू अनावर झाले. यावेळी दुरवरून परिक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी संतापही व्यक्त केला आहे.

Maratha Reservation:ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची तब्येत खालावली

ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची लेखी हमी सरकारने द्यावी, या मागणीवर ठाम असलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी यांनी जालन्यात उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. आज सकाळी त्यांची काहीशी तब्येत खालवल्याने डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केली.

Turbhe: तुर्भे एमआयडीसी परिसरात पाण्यात बुडून 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Turbhe: नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी विभागात असलेल्या स्टोनक्वारीच्या पाण्यात पोहायला गेलेल्या पाच मित्रांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली. पाचही मित्र अल्पवयीन होते, मात्र पोहत असताना मस्तीमध्ये एका मित्राने दुसऱ्या मित्राचा पाय पाण्यामध्ये खेचला. त्यामुळे बुडून एका 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. तुर्भे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत चारही मित्रांना ताब्यात घेत चौकशी केली असता दोघांनी गुन्हा कबूल केलाय

Delhi Metro:UPSC च्या विद्यार्थांसाठीदिल्ली मेट्रो ट्रेनचा निर्णय;फेज-3 चीट्रेन सेवा आज लवकर सुरू होणार

Delhi Metro: प्रिलिम्स परिक्षेसाठी जाणाऱ्या UPSC उमेदवारांच्या सोयीसाठी फेज-3 ची दिल्ली मेट्रो ट्रेन सेवा आज लवकर सुरू होणार आहे.

Delhi Metro train services on Phase-3 begins early today to facilitate UPSC candidates appearing for Prelims

Read @ANI Story | https://t.co/OgHSTebtEk#UPSC #Delhimetro #Prelims pic.twitter.com/K5IuBSRhHe

— ANI Digital (@ani_digital) June 16, 2024

Eknath Shinde: निरंजन डावखरे यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे ठाण्यात घेणार मेळावा

कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारासाठी आज ठाण्यात महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मेळाव्याला प्रमुख उपस्थिती असणार आहे

Navi Mumbai: नवी मुंबईत आजपासून तीन दिवस पाणी कपात

नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणामध्ये ४१ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने शनिवारपासून आठवड्यातून तीन दिवस सायंकाळी विभागवार पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर अपघात, 4 जण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचपीर वाडी फाटा शिवारात सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे एका कारचा अपघात झालाय. या अपघातामध्ये 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.

Ashadi Vari: पालखी सोहळ्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

पालखी सोहळ्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी 3906 आरोग्य कर्मचारी असणार तैनात आहेत. पालखी सोहळ्यासाठी पुणे आरोग्य परिमंडळातून वैद्यकीय अधिकारी, आरोग्य दूत,आरोग्य सेवक असे एकूण 3906 कर्मचारी असणार सेवेत असणार आहेत. पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरु आहे.

MHT CET: 'एमएचटी- सीईटी’चा निकाल आज होणार जाहीर

एमएचटी- सीईटी’चा निकाल आज जाहीर होणार आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतलेल्या ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षेचा निकाल आज लागणार आहे. सायंकाळी सहा वाजता हा निकाल घोषित करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.

Latest Marathi News: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर (2024)
Top Articles
Latest Posts
Article information

Author: Edwin Metz

Last Updated:

Views: 6646

Rating: 4.8 / 5 (78 voted)

Reviews: 93% of readers found this page helpful

Author information

Name: Edwin Metz

Birthday: 1997-04-16

Address: 51593 Leanne Light, Kuphalmouth, DE 50012-5183

Phone: +639107620957

Job: Corporate Banking Technician

Hobby: Reading, scrapbook, role-playing games, Fishing, Fishing, Scuba diving, Beekeeping

Introduction: My name is Edwin Metz, I am a fair, energetic, helpful, brave, outstanding, nice, helpful person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.